क्रीडा

सिबिईयु कॅरम ट्रॉफी स्पर्धेत तनया, संचिता, आर्यन, प्रसन्न उपांत्यपूर्व फेरीत

SBEU Carrom Trophy Description

मुंबई /-आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे सिबिईयु व न्यू इंडिया अॅशुरन्स कंपनी लिमिटेड सहकार्याने आयोजित शालेय मुलामुलींच्या विनाशुल्क कॅरम स्पर्धेमध्ये राष्ट्रीय ख्यातीची सबज्युनियर कॅरमपटू तनया दळवी, श्री महावीर जैन इंग्लिश स्कूल-कल्याणची संचिता मोहिते, न्यू इंग्लिश स्कूल-जैतापूरचा आर्यन राऊत, पोद्दार अकॅडमी-मालाडचा प्रसन्न गोळे, पाटकर विद्यालय-डोंबिवलीचा नील म्हात्रे आदींनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. व्ही.एन.सुळे गुरुजी शाळेच्या ग्रीष्मा धामणकरने प्रारंभी आघाडी घेऊनही महात्मा गांधी विद्यालयाची उदयोन्मुख कॅरमपटू तनया दळवीने तिला ६-५ असे चकविले. मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, जैतापूर आदी जिल्ह्यातील शालेय सबज्युनियर ४४ कॅरमपटूंच्या दर्जेदार खेळास प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे.

सरळ जाणाऱ्या सोंगट्याचे सातत्य राखत संचिता मोहितेने प्रेक्षा जैनचे आव्हान २१-४ असे संपुष्टात आणले आणि उपांत्यपूर्व फेरी गाठली. प्रसन्न गोळेने अचूक फटके साधत ८ वर्षीय केवल कुलकर्णीची विजयीदौड १८-६ अशी रोखली. अन्य सामन्यात आर्यन राऊतने श्रीशान पालवणकरचा १३-११ असा, प्रसाद मानेने ध्रुव भालेरावचा ७-५ असा, ध्रुव शाहने वेदांत राणेचा १९-० असा, सोहम जाधवने अद्वैत पलांडेचा १०-९ असा तर नील म्हात्रेने वेदांत लोखंडेचा ११-४ असा पराभव करून उपउपांत्यपूर्व फेरी जिंकली. को-ऑपरेटीव्ह बँक एम्प्लॉईज युनियनचे खजिनदार प्रमोद पार्टे, कॅरमप्रेमी अविनाश नलावडे, प्रमुख पंच चंद्रकांत करंगुटकर, संयोजक लीलाधर चव्हाण आदींनी उद्घाटनप्रसंगी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. पहिल्या १६ विजेत्या-उपविजेत्यांना स्ट्रायकरसह पुरस्कार दिला जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!