आर्थिक जगत बातम्याधर्म

गणेश चतुर्थी निमित्त कल्याण ज्वेलर्सचे खास कलेक्शन

गणेश चतुर्थी निमित्त कल्याण ज्वेलर्सचे खास कलेक्शन

उत्सवी काळात दागिने हे केवळ शोभा नाही, तर ते आशीर्वाद, वारसा आणि आनंदाचं प्रतीक बनतात

POSTED BY: ANGHA SAKPAL, AUGUST 24 , 2025

मुंबई,‹T>.  :- गणेश चतुर्थी हा केवळ एक उत्सव नाही, तर यावेळी गणेशाबरोबर बुद्धी, समृद्धीचे आगमन आपल्या घरी होत असतं. पूर्ण वातावरणात घुमणारा गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष आणि ठिकठिकाणी दिसणारी चमकदार आरास यांच्या जोडीला परंपराचं पालन केलं जातं, कुटुंब एकत्र येतं आणि प्रत्येक गोष्टीत भक्तीचं प्रतिबिंब दिसतं. या उत्सवी काळात दागिने हे केवळ शोभा वाढवण्यासाठी राहात नाही, तर ते आशीर्वाद, वारसा आणि आनंदाचं प्रतीक बनतात. गणेश चतुर्थीचा हा उत्सव साजरा करण्यासाठी कल्याण ज्वेलर्स काही खास दागिने घेऊन आले आहोत. त्यात भक्तीमय पेंडंटपासून नाजूक कलाकुसर असलेल्या नक्षीपर्यंत विविध दागिन्यांचा समावेश आहे. भेट म्हणून देण्यासाठी सुंदर गणेशमूर्तीचाही त्यात समावेश असून प्रत्येक निर्मिती पिढ्यानपिढ्या आनंद देणारी आहे. या उत्सवाच्या निमित्ताने योग्य दागिने किंवा प्रियजनांसाठी अर्थपूर्ण भेटवस्तूच्या शोधात असाल, किंवा घरासाठी काही खास खरेदी करायची असेल, तर बाप्पाच्या आशीर्वादाइतकेच चमकदार असलेले हे दागिने खरेदी करायला हवे.

आशीर्वादाची प्रचिती : गणेशाच्या आकाराचे सोन्याचे कानातले गणेश चतुर्थीचा आनंद साजरा करण्यासाठी हे अँटिक पद्धतीचे सोन्याचे कानातले तयार करण्यात आले असून त्याच्या केंद्रस्थानी गणेशाचा सुंदर आकार कोरण्यात आला आहे. नाजूक शिंपल्याच्या आकाराची नक्षी आणि लाल रंगांच्या खड्यांनी सजवलेले हे कानातले पारंपरिक व भक्तीमय भावना जागृत करतात. खाली लावण्यात आलेले नाजूक लटकन उत्सवी वातावरणात शोभून दिसतील. देवळात जाण्यासाठी, उत्सवाच्या निमित्ताने प्रियजनांना भेटण्यासाठी जाताना परिधान करण्यासाठी हे कानातले योग्य आहेत. डिझाइन आणि भक्तीचा मेळ घालणारे हे कानातले तुमच्या दागिन्यांच्या कलेक्शनमध्ये उठून दिसतील.

भक्तीमय उपहार: गार्नेट बीड्सच्या माळेत गणेश पेडंट हे आकर्षक नेकलेस गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर परिधान करण्यासाठी गणेशाचे ठळक पेडंट नाजूक कलाकुसर व अँटीक गोल्ड फिनिशसह बनवण्यात आले आहे. पेंडंटला नाजूक कलाकुसर व छोट्या माणकांनी सजवण्यात आलं आहे. याचं पारंपरिक स्वरूप लालबुंद गार्नेट बीड्सनी आणखी खुललं आहे. हे राजेशाही नेकलेस समृद्धी व शक्तीचं प्रतीक आहे. पुजेदरम्यान सिल्कच्या साडीवर परिधान करण्यासाठी किंवा भेट देण्यासाठी भक्ती व अभिजातता यांचं प्रतीक असलेलं हे नेकलेस उठावदार आहे.

राजेशाही वारसा: गणेश मोतिफसह टेंपल झुमका पारंपरिक टेंपल ज्वेलरीचा सर्वोत्कृष्ट नमुना असलेला हा सोन्याचा झुमका आणि त्यावर गणेशाचं बारीक कलाकुसरीसह सजवण्यात आलेलं पेडंट आणि त्यावरील चमकदार कमान सुरक्षा व समृद्धीचं प्रतीक आहे. नाजूक पानाचं डिझाइन व त्याभोवती जडवलेले कुंदन स्टोन्स राजेशाहीपणा देतात. गणेश चतुर्थीसारख्या सणाच्या वेळेस कांचीपुरम सिल्क किंवा भरजरी लेहंग्यावर हे झुमके उठून दिसतील.

शुभारंभ : गणपती बाप्पांची अँटिक फिनिश असलेली मूर्ती अँटीक गोल्ड फिनिश असलेल्या या मूर्तीमध्ये गणराय नृत्यमय रूपात दिसतात. आनंद, बुद्धी आणि विघ्न दूर करणाऱ्या गणपती बाप्पांची ही मूर्ती बघताक्षणी आनंद देणारी आहे. मूर्तीवरचे दागिने बारकाई कोरण्यात आले असून त्यांचा पोशाखही विशेषत्वानं कोरण्यात आला आहे. ही मूर्ती पारंपरिक नक्षीकाम व भक्तीमय उर्जाची अनुभूती देणारी आहे. गणेश चतुर्थीला ही मूर्ती केंद्रस्थानी ठेवण्यात येईल किंवा भेट देता येईल. ही मूर्ती आशीर्वाद, समृद्धी आणि नव्या प्रारंभाची प्रेरणा देत राहील.

शुभ वैभव: गणेश पेंडंट आकर्षक बीड्ससह उत्सवाचा आनंद द्विगुणित करणाऱ्या या नेकलसेमध्ये अँटीक गोल्ड फिनिश असलेले गणेशाचे पेंडंट देण्यात आले असून सोबत नीलम मण्यांची माळ देण्यात आली आहे. भक्ती, सुरक्षा आणि समृद्धीचं प्रतीक असलेलं हे नेकलेस बारीक कलाकुसरीसह बनवण्यात आलं असून त्याला खाली जडवण्यात आलेले सोन्याचे लटकन आकर्षक दिसतात. गणेश चतुर्थीसारख्या उत्सवासाठी योग्य असलेले हे नेकलेस श्रीमंती, पावित्र्य आणि वारसाशाचे प्रतीक आहे.

टेम्पल मॅजेस्टी: कमळाचे मोतिफ्स असलेली चेन आणि गणेशाचे पेंडंट या भारदस्त नेकलेसमध्ये गणेशाचे पेंडंट रूबीसारखे बीड्स व कमळाचे नाजूक मोतिफ्ससह देण्यात आले असून ते शुद्धता व अध्यात्माची अनुभूती देणारे आहेत. कमळ आणि मण्यांत गुंफण्यात आलेले हे नेकलेस राजेशाही स्वरूपाचे असून पेंडंटच्या खाली असलेले सोन्याचे लटकन उठावदार दिसतात. गणेशचतुर्थी असो किंवा लग्न किंवा इतर शुभ प्रसंग, हे नेकलेस आकर्षक व राजेशाही दिसेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!