मनोरंजन

प्रादेशिक जाहिरातपट ‘बाप्पांचा आशीर्वाद’ सादर,‘बाप्पांच्या आशीर्वाद’ जाहिरातपटात बांधिलकीच्या सौंदर्याला मराठी स्पर्श

प्रादेशिक जाहिरातपट ‘बाप्पांचा आशीर्वाद’ सादर,‘बाप्पांच्या आशीर्वाद’

POSTED BY: ANGHA SAKPAL, AUGUST 24, 2025

मुंबई,  :- टाटा समूहातील कॅरेटलेन या दागिन्यांच्या ओम्नीचॅनल ब्रँडने आपला नवीन प्रादेशिक जाहिरातपट ‘बाप्पांचा आशीर्वाद’ सादर केला आहे. ही नवी जाहिरात ‘कॅरेटलेन’ ने प्रेक्षकांसमोर आणली आहे.‘बाप्पांचा आशीर्वाद’ या जाहिरातपटाच्या माध्यमातून ‘कॅरेटलेन’ ने महाराष्ट्रातील संस्कृतीशी, इथल्या लोकांशी आपले नाते अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘बीबीएच इंडिया’ च्या सहकार्याने तयार करण्यात आलेल्या या जाहिरातपटामध्ये, गणेशोत्सवाच्या जल्लोषी वातावरणातील एका आधुनिक विवाह प्रस्तावाची कथा रंगविण्यात आली आहे. प्रेमी युवकाना त्यांच्यातील नात्याची बांधिलकी स्वीकारायला यात अतिशय सौम्यपणे प्रोत्साहन दिले गेल आहे. स्थानिक उत्सव, परंपरा आणि वैश्विक प्रेमकथा यांची गुंफण सादर करून कॅरेटलेनने महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनाशी अधिक सखोल नाते जोडण्याचा प्रयत्न केला आहे.

सौमेन भौमिक, व्यवस्थापकीय संचालक, कॅरेटलेन म्हणाले,“कॅरटलेनमध्ये आम्ही मानतो की प्रेमकथा या हृदयाच्या भाषेत, म्हणजेच मातृभाषेत सांगितल्या गेल्या तर त्या सर्वात सुंदर ठरतात. ‘बाप्पांचा आशीर्वाद’ या जाहिरातिच्या माध्यमातून महाराष्ट्राची वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आणि परंपरा आम्ही साजरी करीत आहोत. गणपतीच्या मिरवणुकीत विवाहाचा प्रस्ताव मांडण्याचा आनंद आणि तो स्वीकारला जाण्याचाही आनंद हे अलौकिक आहे. एक ब्रँड म्हणून आम्हाला जोडप्यांचे हे क्षण अधिक ख़ास व अविस्मरणीय व्हावे अशी इच्छा आहे. तो जादुई क्षण, जेव्हा वेळ थांबते आणि इतर सगळे विसरले जाते, अशा दुर्मिळ अनुभवांचा भाग होण्याचे भाग्य आम्हाला लाभले आहे.”

परिक्षित भट्टाचार्य, चीफ क्रिएटिव्ह ऑफिसर, बीबीएच इंडिया यांनी म्हटले,“‘बाप्पाकडून मिळालेला हलका कौल हा प्रेमाच्या हलक्या, गोड प्रेरणेला नव्या भाषेत, नव्या पार्श्वभूमीवर पुढे नेतो. या कथेतील भावना सार्वत्रिक आहे; तिच्या पार्श्वभूमीतील रस्ते, ढोल-ताशाचा आवाज आणि गुलालाचे रंग हे ठसठशीतपणे स्थानिक आहेत. बाप्पाचा संकेत आणि प्रियतमेचा होकार या दोन्ही गोष्टींतून प्रेक्षकांना आपला स्वतःचा प्रवास डोळ्यासमोर येईल, अशी आम्हाला आशा आहे,”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!