Uncategorized

शिवाश्रित फू ड्स शिशिटेडचा आयपीओ 22 ऑगस्ट 2025 रोजी होणार

Shivashrit Foods Limited's IPO to open on August 22, 2025

POSTED BY:MRUNALI, AUGUST 18 , 2025

  • एकूण इश्यू साईझ – ₹10 दर्शनीय मूल्य असलेले 49,32,000 इक्विटी शेअर्स
  • फ्रेश इश्यू – ₹10 दर्शनीय मूल्य असलेले 43,16,000 इक्विटी शेअर्स
  • ऑफर फॉर सेल – ₹10 दर्शनीय मूल्य असलेले 6,16,000 इक्विटी शेअर्स
  • आयपीओ साईझ – ₹70.03 कोटी (उच्च प्राइस बँडवर)
  • प्राइस बँड – ₹135 ते ₹142 प्रति शेअर
  • लॉट साईझ – 1,000 इक्विटी शेअर्स

मुंबई(NHI.I), : शिवाश्रित फूड्स लिमिटेड (शिवाश्रित, द कंपनी) ही एक आघाडीची पोटॅटो फ्लेक्स उत्पादक, पुरवठादार आणि निर्यातदार कंपनी आहे. ही कंपनी शुक्रवार, 22 ऑगस्ट 2025 रोजी आपला आयपीओ खुला करत आहे. यामधून ₹70.03 कोटी उभारण्याचे उद्दिष्ट असून शेअर्स NSE Emerge प्लॅटफॉर्मवर लिस्ट केले जाणार आहेत. आयपीओसाठी ₹10 दर्शनीय मूल्याचे 49,32,000 शेअर्स आहेत आणि किंमत बँड ₹135 ते ₹142 प्रति शेअर निश्चित करण्यात आला आहे.

इक्विटी शेअर वाटप (आरक्षण):

  • QIB अँकर भाग – 14,03,000 इक्विटी शेअर्सपर्यंत
  • क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर (QIB) – 9,36,000 शेअर्सपर्यंत
  • नॉन इंस्टीट्यूशनल इनवेस्टर्स (NII) – किमान 7,05,000 इक्विटी शेअर्स
  • रिटेल इंडिवीज्युअल इन्व्हेस्टर्स – किमान 16,40,000 इक्विटी शेअर्स
  • मार्केट मेकर – 2,48,000 इक्विटी शेअर्सपर्यंत

आयपीओमधून उभारलेली रक्कम कंपनीकडून पुढील गोष्टींसाठी वापरण्यात येईल:

  • इमारतीचे बांधकाम
  • उत्पादनासाठी प्लांट व मशिनरी (आलू फ्लेक्स लाइन मशिन) बसवणे
  • युटिलिटीज – बॉयलर, ETP प्लांट, पॉवर जनरेटर, सोलर पॅनल इत्यादी
  • कार्यकारी भांडवली गरजा
  • सामान्य कॉर्पोरेट हेतू

अँकर पोर्शन 21 ऑगस्ट 2025 रोजी खुले होईल आणि 26 ऑगस्ट 2025 रोजी आयपीओ बंद होईल. बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत मार्क कॉर्पोरेट अॅडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड व रजिस्ट्रार माशितला सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड आहेत. शिवाश्रित फूड्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक, श्री निशांत सिंघल, यांनी सांगितले: आमच्या विकास प्रवासातील या महत्त्वाच्या टप्प्यावर आम्ही अत्यंत आनंदित आहोत. गेल्या काही वर्षांत आम्ही प्रीमियम दर्जाच्या आलू फ्लेक्स उत्पादक म्हणून ओळख निर्माण केली आहे. देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय खाद्यप्रक्रिया व स्नॅक्स उद्योगातील ग्राहकांना दर्जेदार, नाविन्यपूर्ण आणि वेळेवर उत्पादनांची पूर्तता करून आम्ही विश्वास निर्माण केला आहे.

आयपीओद्वारे उभारण्यात येणारी भांडवली रक्कम आमचं उत्पादन क्षमतेत लक्षणीय वाढ करेल, आधुनिक तंत्रज्ञान समाविष्ट करू शकेल आणि वाढत्या मागणीस उत्तर देण्यासाठी उत्पादन विस्तारीत करेल. त्यामुळे आमची स्पर्धात्मकता बळकट होईल, नवीन बाजारपेठा खुल्या होतील आणि आमचा उत्पादन पोर्टफोलिओ वैविध्यपूर्ण होईल.; बुक रनिंग लीड मॅनेजर, मार्क कॉर्पोरेट अॅव्हायझर्स प्रा. लि. म्हणाले: "आम्हाला शिवाश्रित फूड्स लिमिटेडच्या आयपीओ प्रवासाचा भाग होण्याचा आनंद आहे. ही कंपनी प्रीमियम दर्जाच्या आलू फ्लेक्सची निर्मिती करून भारतात आणि विदेशात आपला ठसा उमठवते आहे. गुणवत्ता, नाविन्य आणि वेळेवर वितरणाची कटाक्षाने पूर्तता करून तिने अनेक मजबूत व्यावसायिक संबंध प्रस्थापित केले आहेत.

भारतातील प्रक्रिया खाद्य उद्योग वेगाने वाढतो आहे – शहरीकरण, सुलभ खाद्यपदार्थांची वाढती मागणी आणि निर्यातीच्या संधी यामुळे. त्यातच आलू आधारित उत्पादनांचे क्षेत्रदेखील वाढते आहे. शिवाश्रितचा आयपीओ त्यांना क्षमता वाढवण्यासाठी, आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी आणि पुरवठा साखळी बळकट करण्यासाठी मदत करणार आहे – जे त्यांना दीर्घकालीन विकास व नवीन बाजारांमध्ये स्थान मिळवून देईल.

शिवाश्रित फूड्स लिमिटेडबद्दल: शिवाश्रित फूड्स लिमिटेड ही एक आघाडीची कंपनी आहे जी उच्च दर्जाचे पोटॅटो फ्लेक्स तयार करते. हे फ्लेक्स रेडी टू ईट, स्नॅक्स, व प्रक्रिया खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. कंपनीचे तीन ब्रँड आहेत – Shivashrit, Shree Aahar आणि Flaker’s. B2B (व्यावसायिक वापरासाठी): शिवाश्रित ब्रँड अंतर्गत B2C (ग्राहकांसाठी): शिवाश्रित श्री आहार ब्रँड  अंतर्गत कंपनीची अत्याधुनिक उत्पादन सुविधा अलीगढ, पश्चिम उत्तर प्रदेश येथे आहे. येथे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाते,  ज्यामुळे गुणवत्ता, कार्यक्षमता आणि वेळेवर वितरण याची खात्री दिली जाते.

आर्थिक प्रदर्शन – वित्तीय वर्ष 2024-25 (FY25):

  • एकूण महसूल (Revenue): ₹10,469.34 लाख
  • ऑपरेटिंग EBITDA: ₹2,309.66 लाख
  • शुद्ध नफा (PAT): ₹1,205.50 लाख

अस्वीकरण: या दस्तऐवजात काही विधानं भविष्याभिमुख स्वरूपाची असून ती भविष्यातील घडामोडींवर आधारित आहेत. यामध्ये धोके आणि अनिश्चितता असू शकतात जसे की सरकारी निर्णय, स्थानिक राजकीय व आर्थिक परिस्थिती, तांत्रिक बदल इत्यादी. अशा विधानांच्या आधारे घेतलेल्या कृतीसाठी कंपनी जबाबदार असणार नाही आणि अशा विधानांमध्ये बदल झाल्यास ती सार्वजनिकपणे अपडेट करण्याचे कोणतेही दायित्व स्वीकारणार नाही.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!