Uncategorized

उद्यानगणेश शालेय कॅरम स्पर्धेत सोहम, प्रसन्न, उमैरची विजयी सलामी

उद्यानगणेश शालेय कॅरम स्पर्धेत सोहम, प्रसन्न, उमैरची विजयी सलामी

POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 19/01/2026 📞  8850212023

मुंबई NHI24.COM(M) श्री उद्यानगणेश मंदिर सेवा समिती मुंबई व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु झालेल्या श्री उद्यानगणेश मंदिर चषक विनाशुल्क शालेय कॅरम स्पर्धेत सोहम जाधव, प्रसन्न गोळे, उमैर पठाण, केवल कुलकर्णी आदींनी सलामीचे सामने जिंकले. शारदाश्रम विद्या मंदिरच्या सोहम जाधवने अचूक खेळ करीत पार्ले टिळक विद्यालयाच्या आर्या सोनारचे आव्हान २१-५ असे संपुष्टात आणले आणि दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. समितीचे कार्यवाह मधुकर प्रभू, व्यवस्थापक संजय आईर, क्रीडा प्रशिक्षक निशांत पाटील, क्रीडा संघटक सुनील नागवेकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे शानदार उद्घाटन झाले.

श्री उद्यानगणेश माघी जन्मोत्सवानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील श्री उद्यानगणेश मंदिर मंडपामधील कॅरम स्पर्धेत राष्ट्रीय ख्यातीचा सबज्युनियर कॅरमपटू प्रसन्न गोळेने प्रारंभापासून मोठी आघाडी घेत कुमुदिनी विद्या मंदिराच्या आदिराज जळकेवर २५-४ असा सहज विजय मिळविला. श्री नारायण गुरु हायस्कूलच्या उमैर पठाणने प्रियांश यादवला २५-० असा नील गेम देतांना अचूक फटक्यांची आतषबाजी केली. आयईएस पाटकर विद्यालय-डोंबिवलीच्या शिवांश मोरेने ठाकूर रामनारायण पब्लिक स्कूलच्या तीर्थ ठाकरला १९-१ असे तर शेठ करमशी कानजी स्कूल-मुलुंडचा केवल कुळकर्णीने महिला मंडळ विद्यालयाच्या सिध्देश बागुलला २०-३ असे पराभूत करून पहिली फेरी जिंकली. ४८ खेळाडूंच्या स्पर्धेमधील पहिल्या १६ विजेत्यांना आकर्षक चषकासह स्ट्रायकर व टी शर्ट पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!